अभिनेत्री तापसी पन्नूचा ‘रश्मी रॉकेट’ चित्रपट झी 5 वर प्रदर्शित होणार 15 ऑक्टोबरला

0
79

अभिनेत्री तापसी पन्नू ‘रश्मी रॉकेट’ हा चित्रपट येत्या दसऱ्याला म्हणजेच 15 ऑक्टोबरला झी5 वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांच्या आरएसवीपी आणि मैंगो पीपल मीडियाद्वारे करण्यात आली आहे.

 आकर्ष खुराना दिग्दर्शित ‘रश्मी रॉकेट’ नंदा पेरियासामी यांच्या मूळ कथेवर आधारित आहे. या चित्रपटाची एका छोट्या गावातल्या तरुण मुलीची कथा आहे.यामध्ये ‘रश्मी’ला आपले स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची आणि स्पर्धेत व्यावसायिक रूपाने सहभागी होण्याची संधी मिळते मात्र फिनिश लाइन आणि धावणे यामध्ये अनेक संकटे असल्याचे तिला जाणवते. अखेरीस या स्पर्धेचे रूपांतर एथलेटिक स्पर्धा सम्मान आणि तिच्या व्यक्तिगत लढाईत होते. पोस्टरमधून तापसी धैर्यशील आणि दृढ निश्चयी दिसते आहे.यामध्ये सुप्रिया पाठक, अभिषेक बनर्जी, प्रियांशु पेन्युली आणि सुप्रिया पिळगांवकर देखील मुख्य भूमिकेत असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here