अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचे निधन

0
78

अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती आणि चित्रपट निर्माते राज कौशल यांचे आज निधन झाले. मंदिरा बेदी यांच्या मित्राने राज कौशल यांचे मृत्यूची बातमी दिली आहे. पहाटे साडेचार वाजता राज यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राज ४९ वर्षांचे होते. 27 जूनला राज आणि मंदिरा यांनी त्यांच्या मित्र परिवारासोबत पार्टी एन्जॉय केली होती. त्यानंतर राज यांच्या निधानाची अचानक बातमी आल्याने सर्वानाच मोठा धक्का बसला आहे.
राज कौशल यांनी ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ आणि ‘अँथनी कौन है’ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. मंदिरा आणि राज यांचे 14 फेब्रुवारी 1999 रोजी लग्न झाले होते. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. गेल्या वर्षी राज आणि मंदिरा यांनी मुलगी ताराला दत्तक घेतले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here