अभिनेत्री माही विजच्या भावाचे कोरोनाने निधन

0
73

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री माही विज हिच्या भावाचे काही दिवसांपूर्वी कोरोनाने निधन झाले. माहीने सोशल मीडियावर भावाचा फोटो शेअर करत भावाच्या निधनाची माहिती दिली आहे. त्याचबरोबर तिने अभिनेता सोनू सूद आणि कॉमेडियन भारती सिंहचे आभार मानले आहेत.

काही दिवसांपूर्वी माहीच्या भावाला करोना झाला होता. त्यानंतर बॉलिवूड अभिनेता सोनू सूद आणि कॉमेडियन भारती सिंहने तिला मदत केली होती. माहीने सोनू सूदच्या ट्वीटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने म्हटलंय, ‘माझ्या भावासाठी रुग्णालयात बेड मिळवून दिल्याबद्दल सोनू सूद तुझे आभार. या कठीण कळात मला तू हिंमत दिलीस. तुम्ही माझी मदत केल्याबद्दल तुमचे आभार.’

तसेच भावाचा फोटो शेअर करत माहीने भावनिक पोस्ट लिहिली आहे. ‘मी तुला गमावले नाही. तू माझी ताकद आहेस. माझे तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे आणि ते नेहमी करत राहिन. मला शक्य असतं तर मी काही दिवस मागे गेले असते. तुला मिठी मारली असती आणि तुला कधीही जाऊ दिले नसते. तू माझ्यासाठी हिरो आहेस’, या आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here