अभिनेत्री रेणुका शहाणेला कोरोनाची लागण

0
80
अभिनेत्री रेणुका शहाणेला कोरोनाची लागण

अनेक प्रसिद्ध कलाकार गेल्या काही दिवसांपासून कोेरोना पॉझिटिव्ह त आहेत. त्यातच, आज प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणेलाही कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी रेणुकाचे पती आशुतोष राणा यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता त्यांच्या संपूूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे शनिवारी म्हणजेच १७ एप्रिल रोजी आशुतोष राणा यांची पत्नी रेणूका शहाणे आणि त्यांची मुलं शौर्यमान आणि सत्येंद्र या सगळ्यांची कोेरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे.

हे सगळे घरीच आयसोलेशनमध्ये राहत आहेत. या आधी आशुतोष राणाने स्वत:ला होम क्वारंटाईन केलं होतं. आशुतोष राणा आणि रेणूका शहाणे या दोघांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना काळजी घेण्यास सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी आशुतोष आणि रेणूका या दोघांनीही कोरोनाची पहिली लस घेतली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here