अभिनेत्री शिल्पा शेट्टीने संपुर्ण कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट करत दिली आहे.त्यात तिने ‘मागील 10 दिवस आमच्या कुटुंबासाठी खूप कठीण होते. माझ्या सासु-सासऱ्यांची कोरोनो चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर समिषा, विहान, माझी आई आणि आता राज यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. हे सगळे त्यांच्या त्यांच्या रुममध्ये आयसोलेशनमध्ये आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहेत. ‘असे लिहिले आहे.
शिल्पाचा आठ वर्षांचा मुलगा विहान, पती राज कुंद्रा, आणि सासु-सासरेही कोविड पॉझिटिव्ह आहेत. शिल्पाचा मात्र कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. शिल्पाने , ‘तुम्ही करोना पॉझिटिव्ह असो वा नसो, कृपया मास्क घाला, स्वच्छता ठेवा आणि सुरक्षित रहा. तरीसुद्धा मानसिकदृष्ट्या पॉझिटिव्ह रहा.’ असेही लिहिले आहे.