अमरिकेच्या बरोबर चीनने उतरवले आपले अवकाशयान मंगळावर !

0
81

बीजिंग – चीनने आपले अवकाशयान आज (शनिवारी) अगदी सुखरूपपणे मंगळाच्या पृष्ठभागावर सुखरूप उतरवले. अमेरिकेनंतर मंगळाच्या जमिनीवर यान उतरविणारा चीन हा जगातील दुसरा देश ठरला आहे. यासंबंधी चायना नॅशनल स्पेस ॲडमिनीस्ट्रेशनच्या वतीने अधिकृत घोषणा करण्यात आली.

चीनच्या हा रोव्हर मंगल ग्रहाच्या युटोपिया इम्पॅक्ट बेसिनमधील एका सपाट मैदानावरउतरला आहे .याचे वजन हा २४० किलो असून सहा चाकांचा हा रोव्हर पुढील तीन महिने मंगळाच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणार आहे. चीनचे हे अवकाशयान ऑर्बायटर लॅंडर आणि रोव्हरसहीत २३ जुलै २०२० मध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते.
मंगळावरच्या यशस्वी लँडिंगनंतर तियानवेन -१ यानाच्या झुरॉन्ग बग्गीने पृथ्वीवर टेलिमेट्री सिग्नल पाठवला. यातून युटोपिया प्लेटवर लॅंडर सुखरूप उतरल्याचे सिद्ध झाले.

अमेरिकेनंतर अशी मोहीम यशस्वी करणाऱ्या चीनने एक आव्हानात्मक मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या (सीपीसी) केंद्रीय समितीने तियानवेन-१ मोहिमेतील शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here