अमेरिकेच्या इंडियाना पोलिस शहरात गोळीबारात 4 शीख भारतीय ठार

0
81

अमेरिकेच्या इंडियाना पोलिस शहरात फेडएक्स परिसरात काल गोळीबारा झाला या गोळीबारात ८ लोकांचा मृत्यू झाला .यामध्ये ४ शीख समुदायातील भारतीयांचा समावेश आहे. भारतीय व विशेषकरून शीख समुदायासाठी वंशद्वेषी छळ, शेरेबाजी व भेदभाव नवीन बाब नाही.फेडएक्स डिलिव्हरी सर्व्हिसच्या गोदामातील 90% कामगार भारतीय-अमेरिकन आहेत आणि बहुतेक शीख समुदायाचे आहेत.

गोळीबार करणारा १९ वर्षांचा गौरवर्णीय अमेरिकी ब्रँडन स्कॉट होल फेडएक्सचा माजी कर्मचारी आहे.या गोळीबारात अमरजित कौर जोहल (६६), जसविंदर कौर (६४), जसविंदर सिंह (६८) व अमरजित सेखों (४८) यांचा मृत्यू झाला.या घटनेत 5 लोक जखमीही झाले आहेत. जखमींमध्ये शीख हरप्रीतसिंग गिल (वय 45) यांचा समावेश आहे.अमेरिकी ब्रँडन स्कॉट होल फेडएक्सचा माजी कर्मचारी असून त्याने गोळीबारानंतर स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली.

कारमधून उतरताच हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. शीख कोएलिशनने हेट क्राइमच्या शंकांचा तपास करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे असे इंडियानापोलिसचे डेप्युटी पोलिस चीफ क्रेग मॅक्कार्ट यांनी सांगितले आहे. अद्याप घटनेमागील कारणांचा तपास लागलेला नाही. मात्र हल्लेखोराने बहुतांश शीख कर्मचारी असलेला परिसरच गोळीबारासाठी निवडला होता असे मत संघटनेच्या कार्यकारी संचालक सतजित कौर यांनी मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here