अरबी समुद्रात येत्या तीन ते चार दिवसांत चक्रीवादळाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने उत्तर ते दक्षिण कमी दाबाचा पट्टा विदर्भ व लगतच्या भागापासून मराठवाडा आणि अंतर्गत कर्नाटक मार्गे उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत निर्माण झाला आहे असे सांगितले आहे.
राज्यात १२ ते १६ मे या काळात अनेक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटा सह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्याच्या दक्षिण किनाऱ्यावर वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. समुद्र खवळलेला राहील त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.
१४ ,१५ व १६ मेला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा. बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, परभणी, नगर, सोलापूर, पुणे या भागात पाऊस पडणार आहे