अल्ट्राव्हायोलेट ची महाराष्ट्रात धडाकेबाज एन्ट्री
पुणे – X-47 Crossover आणि त्यांचे प्रगत इलेक्ट्रिक परफॉर्मन्स बाइक्स लॉन्च केल्यानंतर अल्ट्रावायोलेट ने केवळ अट्ठेचाळीस तासांत महाराष्ट्रात तब्बल सहा अनुभव केंद्रे (Experience सेन्टर्स) सुरू करत उत्तुंग वाढीची नवी पायरी गाठली आहे.मुंबईतील अंधेरी, वाशी, ठाणे आणि पुण्यातील शिवाजीनगर, बाणेर, खराडी येथे सुरू करण्यात आलेली ही अत्याधुनिक UV स्पेस स्टेशन्स प्रसिद्ध डीलर्स हॉलमार्क मोबिलिटी (मुंबई) आणि KHV मोबिलिटी LLP (पुणे) यांच्या सहकार्याने उभारण्यात आली आहेत. ग्राहकांना येथे X-47, F77 MACH 2 आणि F77 सुपरस्रीट यांचा टेस्ट राईड, विक्री, सेवा, स्पेअर्स आणि अॅक्सेसरीज यांसह पूर्ण अनुभव मिळणार आहे.
अल्ट्रावायोलेट चे सीईओ नारायण सुब्रमण्यम यांनी सांगितले की, कंपनीची दृष्टी कामगिरी, तंत्रज्ञान आणि शाश्वतता यांचे एकत्रित कनेक्टेड इकोसिस्टम तयार करण्याची आहे. ईव्ही मोटारसायकल मध्ये अत्याधुनिक रेडार इंटेलिजन्स, ट्रॅक्शन कंट्रोल, डायनॅमिक स्टॅबिलिटी कंट्रोल, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग यांसारखी वैशिष्ट्ये देत कंपनीने सुरक्षा आणि परफॉर्मन्सची नवी व्याख्या निर्माण केली आहे.
महाराष्ट्रातील ईव्ही मार्केटमध्ये अल्ट्रावायोलेट ची ही मोठी गुंतवणूक इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या वाढत्या मागणीचा अंदाज दिसत आहे.


