आंतरजिल्हा प्रवास करताना ई -पास आवश्यक

0
104

राज्यात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन आणखीन कडक करण्यात आले आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. आता जिल्ह्याबाहेर प्रवास करायचा असेल तर त्यासाठी ई -पास लागणार आहे.

यासाठी ग्रामीण पोलिस दलाने संकेतस्थळ कार्यान्वित केले आहे. या आधारे ई -पास वितरीत करण्यात येणार आहेत. अत्यावश्यक सेवेमधील कर्मचारी वगळता इतर कुणालाही बाहेर पडता येणार नाही. अशा परिस्थितीत आंतरजिल्हा प्रवास करायचा असेल तर त्यासाठी ई -पासची पुन्हा तरतूद करण्यात आली आहे.

ई -पाससाठी https:/covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळावर जावे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here