आंतरराष्ट्रीय योग दिन

0
61

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे आयोजित योगवर्गात सहभागी होत योगासने केली. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील योगवर्गात सहभाग घेतला.

योग इन्स्टिट्युटच्या जनसंवाद प्रमुख मीना नल्ला, मुख्य प्रशिक्षिका पूजा हेलिवाल तसेच प्रशिक्षक अमर पांधी यांनी यावेळी राज्यपालांसह उपस्थितांना योगासने सांगितली. सांताक्रूझ, मुंबई येथील ‘द योग इन्स्टिट्युट’ या संस्थेच्या अध्यक्षा हंसा जयदेवा यांच्या मार्गदर्शनाखाली योगवर्गाचे आयोजन करण्यात आले.अनेक मराठी कलावंतांनी योग दिनी आपापले योगातील कौशल्य दाखवित आपले फोटो सोशल मीडियावर घातले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here