‘आई कुठे काय करते’ या छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या मालिकेत अभिनेत्री अश्विनी महांगडे यांच्या वडिलांच निधन झाले. प्रदीपकुमार महागंडे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर भोर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते, पण मंगळवारी (18 मे) त्यांची अखेरचा श्वास घेतला.
प्रदीपकुमार हे वाई जिल्ह्यातील पसरणी येथील ज्येष्ठ समाजसेवक होते. अश्विनीच्या अभिनेत्री होण्याच्या वाटचालीमध्ये तिच्या वडिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.