‘आई कुठे काय करते’ मालिकेत पारंपरिक भोंडला उत्साहात खेळला जाणार

0
84

नवरात्रीच्या उत्सवाचा जल्लोष सध्या सगळीकडेच पाहायला मिळतोय.कोकणात नवरात्रीमध्ये भोंडला खेळण्याची प्रथा आहे. नवरात्रीच्या दिवसात पाटावर हत्ती काढून त्याची पूजा केली जाते.घरातल्या स्त्रिया आणि मुली त्याभोवती फेर धरुन भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात.

स्टार प्रवाहच्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेतही हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे. देशमुख कुटुंबात प्रत्येक सणाला विशेष महत्त्व आहे. मराठी परंपरा मराठी प्रवाह हे स्टार प्रवाह वाहिनीचं ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे मालिकांमधून मराठी परंपरा जपण्याचा प्रयत्न केला जातो. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here