भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने स्वस्तात कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. एसबीआयने आपले व्याजदर कमी केले असून आजपासून ते देशभरात लागू झाले आहेत.
एसबीआयचे नवीन व्याजदर 7.45 टक्के झाले आहेत. बेस रेटमध्ये 0.05 टक्के कपात जाहीर केली आहे. बँकेच्या या घोषणेनंतर आता ग्राहकांना होम लोन, ऑटो लोन, पर्सनल लोनसह अनेक प्रकारच्या कर्जाचे कमी मासिक हप्ते भरावे लागतील. जून 2010 नंतर घेतलेली सर्व कर्जे आधार दराशी जोडलेली आहेत.याशिवाय बँकेने रेपो दरातील 0.40 टक्के कपातीचा लाभ कर्जदारांना देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांनी बाह्य बेंचमार्क लिंक्ड लँडिंग रेटच्या आधारावर कर्ज घेतले आहे अशा ग्राहकांना हा लाभ उपलब्ध आहे.