आदर्श माता पुतळा अनावरण कार्यक्रम शिरगाव येथे लोके भवन आवारात पार पडला

0
99

प्रतिनिधी पांडुशेठ साठम

शनिवारी 20 नोव्हेंबर रोजी शिरगाव मध्ये आदर्श माता पुतळा अनावरण कार्यक्रम पार पडला. शिरगाव चे सुपुत्र मा श्री गणेश सहदेव लोके यांनी त्यांची आई कै. सुगंधा सहदेव लोके यांच्या स्मरणार्थ एक भव्य पुतळा लोके भवन येथे उभारला आहे.त्याबरोबर शिरगांव हाय स्कूल मध्ये इयत्ता 11 वी व 12 वी मध्ये शिकत असलेल्या गरीब व होतकरू 7 विद्यार्थ्याचा शिक्षणाचा खर्च करण्याचे ठरविले त्या प्रमाणे त्यांनी शिष्यवृत्ती साठी निवडलेल्या 7 विद्यार्थ्याची शैक्षणिक फी चा रू 31000 धनादेश शाळेचे अधीक्षक श्री रवींद्र जोगल साहेब व प्राचार्य शमशुद्दिन आत्तार यांना प्रदान केला. तसेच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व संदेश पत्र प्रदान केले.

या कार्यक्रमाला श्री गणेश लोके व त्याचे वडील सहदेव लोके उपस्थित होते. गणेश लोके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आईचे महत्व व आईने त्यांना दिलेली शिकवण व संस्कार त्यांना त्यांच्या आयुष्यात मोठे होण्यासाठी कसे उपयुक्त ठरले हे विषद केले. कार्यक्रमाला शाळा अधीक्षक मा. रवींद्र जोगल, संस्था पदाधिकारी वसंत साटम,स्थानिक शाळा समिती सदस्य संदीप साटम, मंगेश लोके, विजय कदम सर, स्थानिक समिती सदस्य. वसंत नाईक,राजेंद्र कदम, राजू शेटे, ग्रामस्थ व शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि कार्यक्रमाचे सूत्र संचालन जयेंद्र चव्हाण सर यांनी केले.सर्वाचे आभार लोके कुटुंबियांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here