आनंद महिंद्रा यांनी नीरज चोप्राला दिली XUV700 कार

0
68

टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये भालेफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला. नीरज चोप्राच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि जागतिक स्तरावर अनेकांनी त्याच्यावर बक्षीसांचा वर्षाव केला आहे. सध्या अनेक जाहिरातीमध्ये झळकत आहे. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही नीराजला कोरी कार दिली आहे.

नीरजला नवी कोरी गाडी गिफ्ट Xuv700 म्हणून पाठवली. त्या गाडीवर 87.58 असे लिहिले आहे. त्यासोबत या गाडीवरत भाल्याची प्रतिकृतीही लावण्यात आल्याचे दिसत आहे. नीरज चोप्राने ट्वीटरवर या कारसोबतचा फोटो पोस्ट करत आनंद महिंद्रा यांचे आभार मानले आहेत. महत्वाचे म्हणजे ऑलिम्पिकमध्ये तब्बल 13 वर्षानंतर भारताला पहिले सुवर्णपदक मिळाले आहे. 2008 बीजिंग ऑलिम्पिकनंतरचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here