आमदार वैभव नाईक यांना राज्याच्या नेतृत्वाची संधी देण्याची शिवसेनेची भूमिका

0
128

शिवसेना पुरग्रस्तांच्या सदैव पाठीशी,कोणतीही यात्रा येवो, शिवसेनेची जनसेवेची यात्रा सुरूच राहणार,शिवसेना नेते संदेश पारकर यांची ग्वाही: वागदेत पूरग्रस्तांना मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून साहित्य वाटप

प्रतिनिधी पांडुशेठ साठम

वागदेत अतिवृष्टीमुळे अनेक घरामध्ये पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे संसार उघड्यावर पडले होते. मात्र ही बाब राज्याचे नगरविकास मंत्री यांच्या आमदार वैभव नाईक यांनी निदर्शनास आणताच श्री नाईक यांच्या माध्यमातून श्री शिंदे यांनी वागदेतील पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणतीही यात्रा येवो शिवसेनेची समाजसेवेची यात्रा सदैव सुरूच राहणार असल्याचा टोला शिवसेना नेते संदेश पारकर यांनी लगावला.

वागदे येथे पूरग्रस्तांना नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून व आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यातुन उपलब्ध झालेले जीवनावश्यक साहित्य वितरण करण्यात आले.


वागदे येथील सांस्कृतिक हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात श्री पारकर बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, यांच्या हस्ते या साहित्याचे वितरण करण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून वागदेतील पूरग्रस्तांना ब्लॅंकेट, चादर, तूरडाळ, तेल यासह अन्य जीवनावश्यक वस्तूंचे किट प्रदान करण्यात आले. या प्रसंगी आमदार वैभव नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, माजी सभापती संदेश पटेल, हर्षद गावडे, सरपंच पूजा घाडीगांवकर, उपसरपंच रुपेश आमडोसकर, युवा सेना तालुका प्रमुख ललित घाडीगावकर, विजय घाडीगांवकर, संभाजी घाडीगावकर, गणपत घाडीगांवकर, दिगंबर घाडीगांवकर, शरद सरगले, रवींद्र गावडे, शिरीष घाडीगावकर, बाळा आरडेकर, दत्ताराम घाडीगावकर, प्रमोद पाताडे, महेंद्र आजगावकर आदी उपस्थित होते.

संदेश पारकर पुढे म्हणाले, ज्यावेळी तोक्ते वादळाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यावेळी कुडाळ मालवण मतदारसंघात आमदार वैभव नाईक यांनी प्रत्येक नुकसानग्रस्तांना आपल्या हक्काचा माणूस म्हणून मदतीचा हात पुढे केला. एवढेच नव्हे तर शासनाच्या माध्यमातून नुकसानग्रस्तांना किमान दहा हजाराच्या वरती तातडीची मदतही मिळवून दिली. त्यांचाच आदर्श घेत कणकवली मतदार संघातील वागदेतील पूरग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली. त्यानुसार सातत्याने पाठपुरावा करत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून त्यांनी ही मदत मिळवून दिल्याचेही श्री पारकर यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी तौक्ते वादळाच्या वेळी कौले, पत्रे यासह अन्यही मदतीचा हात पुढे करत कोकणवासीयांसाठी शिवसेनाच कायम उभी असल्याचे दाखवून दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या महाविकास सरकारच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी असलेले जाचक निकष बाजूला ठेवत भरीव मदत करण्याचे काम सरकारने केले आहे. काही जणांनी एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न केले. मात्र मी बाळासाहेब, आनंद दिघे यांच्या मुशीत घडलेला शिवसैनिक आहे असे सांगत एकनाथ शिंदे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. अशा शिवसैनिक असलेल्या नेत्याकडून आज कोकणासाठी मदत प्राप्त झाली आहे. त्यामुळे मदतीच्या वेळी शिवसेना धावते हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचेही श्री पारकर यांनी सांगितले. ज्या नारायण राणे यांना आ.वैभव नाईक यांनी सिंधुदुर्गाच्या मातीत पराभूत केलं त्या वैभव नाईकांना महाराष्ट्राचे नेतृत्व करू देण्याची भूमिका ही शिवसेनेची आहे. व लवकरच हे स्वप्न देखील पूर्ण होईल असा विश्वास श्री पारकर यांनी यावेळी व्यक्त केला. शिवसेना व सामान्य जनतेच नातं या निमित्ताने आपण अधिकाधिक दृढ करूया असे आवाहन देखील श्री पारकर यांनी याप्रसंगी केले. यावेळी रुपेश आमडोसकर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here