आमिर खान आणि त्याची पत्नी किरण रावचा घटस्फोट

0
69

आमिर आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव यांनी परस्पर सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.दोघांनी लग्नाच्या 15 वर्षांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे.आमिर आणि किरण यांनी घटस्फोटाबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे.

‘आम्ही 15 वर्षे एकत्र घालवताना आनंदाने प्रत्येक क्षण जगलो आणि आमच्या नात्यातील विश्वास, आदर आणि प्रेम वाढतच गेले. आता आम्ही आमच्या जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू करत आहोत – जो पती-पत्नी या नात्याचा नसेल, परंतु तो को-पॅरेंट आणि एकमेकांसाठी कुटुंब म्हणून असेल. आम्ही काही काळापूर्वी विभक्त होण्याचे ठरवले आणि आता आम्ही या वेगळे होत आहोत. आम्ही आमचा मुलगा आझादचे को-पॅरेंट असून आणि एकत्र त्याचे संगोपन करु.आम्ही दोघेही चित्रपट आणि आमच्या पानी फाउंडेशन व्यतिरिक्त आमच्या आवडीच्या सर्व प्रोजेक्टवर एकत्र काम करत राहू. याकाळात आमच्या सोबत राहिलेल्या आमच्या सर्व मित्र आणि कुटुंबाचे मनापासून आभार. त्यांच्या पाठिंब्याशिवाय आम्ही हा निर्णय घेऊ शकलो नसतो. आमच्या हितचिंतकांनीसुद्धा आमच्या घटस्फोटाला शेवट म्हणून नव्हे तर नवीन प्रवासाची सुरुवात म्हणून पहावे अशी आमची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here