आरोग्य विभागातील पेपरफुटीप्रकरणी लातूर आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरेना अटक

0
125

३१ ऑक्टोबर रोजी राज्यात आरोग्य विभागाची भरती परीक्षा पेपर आधीच फुटल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणामध्ये आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोग्य विभागाच्या वतीनेच पुणे सायबर पोलिसात तक्रार झाल्यानंतर प्रकरणी तपासाला वेग आला.

 सोमवारी रात्री लातूर आरोग्य विभागा मुख्य प्रशासकीय अधिकारी बडगिरे याच्यासह अन्य आरोपींना अटक करण्यात आली. यामागे बडगिरे हाच सूत्रधार असल्याचा पोलिसांचा संशय असून १५ लाख रुपयांपेक्षाही अधिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे.आरोपींना शिवाजीनगर न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयाने १२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

लातूर सार्वजनिक आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत व्यंकटराव बडगिरे (५०, रा. योगेश्वरीनगरी, अंबाजोगाई, बीड) डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड (३६, रा. एकात्मता कॉलनी, अंबाजोगाई, बीड), उद्धव प्रल्हाद नागरगोजे (३६, रा. तितरवणे, शिरूर कासार, बीड), श्याम महादू म्हस्के (३८, रा. पंचशीलनगर, अंबाजोगाई, जि. बीड), राजेंद्र पांडुरंग सानप (५१, रा. श्यामनगर, बीड) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तर यापूर्वी विजय मोराडे, अनिल गायकवाड, बबन मुंढे, सुरेश जगताप, संदीप भुतेकर, प्रकाश मिसाळ यांना अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here