आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एनसीबी आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहणार असल्याची चर्चा

0
122

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आर्यनकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज आढळून आलेले नाही. न्यायालयाने देखील आर्यनकडे चौकशी दरम्यान कोणत्याही प्रकारेच पुरावे मिळाले नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता या प्रकरणी एनसीबी आरोपीच्या पिंजऱ्यात उभी राहणार असल्याची चर्चा आहे.एनसीबी मुंबईचे संचालक समीर वानखेडे आर्यन खान प्रकरणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

दरम्यान, आता या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र पोलिस करणार असून, राज्य सरकार विरुद्ध केंद्रीय यंत्रणा यांच्यातील वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असेल तर, त्यांनाच चौकशीच्या फेऱ्यात ओढण्याची तयारी राज्य सरकार करतंय का, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here