‘आशिकी आ गई’ मध्ये प्रभास आणि पूजा हेगडे

0
83

‘राधे श्याम’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. 2022 मधील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी हा एक चित्रपट असणार आहे. हा चित्रपट 14 जानेवारी 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील प्रत्येक गोष्ट चर्चेचा विषय बनली आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे.

‘राधे श्याम’च्या टीमने आपल्या सोशल मीडिया हँडलवर हिंदी गाणे ‘आशिकी आ गई’ शेअर केले आहे.अरिजित सिंगने हे गाणे गायले असून मिथुनने संगीत दिले आहे. हे स्पेशल हिंदी गाणे आपल्या भेटीला येत आहे. हे गाणे प्रभास आणि पूजा हेगडे यांच्यावर चित्रित झाले असून या दोघांची पडद्यावर उत्कृष्ट केमिस्ट्री दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here