पंढरपूरच्या विठोबाची आषाढी एकादशी येत्या 20 जुलै रोजी आहे त्यावेळी महापूजा केली जाते आणि हे पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या महापूजेसाठी निमंत्रण देण्याचा निर्णय श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती हाती आली आहे .
कोरोना महामारीपूल गेल्या वर्षीही आहादी एकादशीला वारकऱ्यांना पंढरपूरला जाता आले नव्हते. यावेळीही कोरोनाचा कहर अजून तरी आटोक्यात आलेला नाही.कोरोनाचे लसीकरणही अजून चालूच आहे .या पार्श्वभूमीवर आज सकाळी श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर समितीची बैठक व्हिडीओ कोन्फेरंसिंगद्वारे पंढरपूर येथील भक्त निवास येथे पार पडली.
या बैठकीत ज्यांचे मानाचे नैवेद्य आहेत. त्या सर्वांना देवाला मानाचा नैवेद्य दाखवण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्यांच्या पादुका व पालखी भेटी ठरलेल्या आहेत त्या भेटी घडवण्यात येणार आहेत. मानाचे वारकरी, दिंडेकरी व मानाची महाराज असे 195 मंडळींना देवाचे दर्शन देण्याचे ठरवण्यात आले आहे.आषाढी यात्रेच्या सोहळ्यादरम्यान विठ्ठल रुख्मिणी मंदिर भाविकांसाठी बंदच राहणार असून ऑनलाईन पद्धतीने दर्शन 12 जुलैपासून भाविकांना चोवीस तास घेता येणार आहे.