‘इंडियन आयडल’ फायनलिस्ट सायली कांबळेचे सिनेसृष्टीत पदार्पण

0
81

इंडियन आयडलच्या बाराव्या पर्वाचे व्यासपीठ गाजवून आपल्या सुरेल स्वरांनी सायली कांबळेने करोडो हृदयांवर अधिराज्य गाजवले. सायलीचे इंडियन आयडल संपताना सिनेसृष्टीत पदार्पण करायचे स्वप्न पूर्ण झाले. फिल्ममेकर राजन दिग्दर्शित ‘कोल्हापूर डायरीज’च्या ह्या गाण्याला अवधूत गुप्तेनी संगीत दिल आहे.

“मला विश्वासच बसत नाही आहे,की माझं स्वप्न पूर्ण झाल आहे . इंडियन आयडलमध्ये जाण्याचं कारणचं होतं, लोकांनी मला ओळखावं आणि माझं संगीत क्षेत्रात करीयर सुरू व्हावं. इंडियन आयडलचा ग्रँड फिनाले झाल्याझाल्या हातात काम असणं, हे भाग्याचं आहे. लहानपणापासून अवधूत गुप्तेंची मी चाहती आहे आणि त्यांच्यासोबत मला काम करायची संधी मिळतेय. चित्रपटाचे दिग्दर्शक जो राजन ह्यांनी मला ही संधी दिली ह्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे.” असे सायली कांबळे म्हणाली.

 “सायलीच्या गळ्यात जादु आहे. तिचा इंडियन आयडलचा संगीत प्रवास मी गेले कित्येक महिने पाहिला आहे. त्यामुळेच मला तिचा अभिमान आहे. ह्या महाराष्ट्राच्या लाडक्या मुलीला मराठी फिल्मसाठी ब्रेक देताना मला खूप आनंद होतो आहे .” असे राजन म्हणाले. संगीतकार, गायक, अवधूत गुप्तेनी आमचे दिग्दर्शक जो राजन ह्यांना सायलीचा आवाज खूप आवडला होता. त्यामुळे त्यांनीच मला सायलीचे नाव ह्या गाण्यासाठी सुचवले. ती किती उत्तम गायिका आहे, ते ती दरवेळी सिध्द करते. सायलीच्या रूपाने एक टॅलेंटेड गायिका महाराष्ट्रालाच नाही तर अख्या जगाला मिळालीय,आपल मत व्यक्त केल. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here