इंडियन ऑईलच्या कॉम्पोजिट सिलिंडरचं लोकार्पण

0
79

देशाचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते नुकतंच इंडियन ऑईल कॉम्पोजिट सिलिंडरचं लोकार्पण करण्यात आलं आहे.‘कॉम्पोजिट सिलिंडर’मुळे घरगुती LPG सिलिंडरचं वजन 7 किलोग्रॅमने कमी होणार आहे.कॉम्पोजिट सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, हे देखील ग्राहक पाहू शकणार आहेत. 

कॉम्पोजिट सिलिंडर मथुरेत खासदार हेमा मालिनी यांच्या हस्ते 25 सप्टेंबरला लॉन्च करण्यात आले. कॉम्पोजिट सिलिंडरची किंमत 700 रुपये असणार आहे. मात्र, ग्राहकांना 4 किलोग्रॅम गॅस कमी मिळेल. कारण कॉम्पोजिट सिलिंडरमध्ये केवळ 10 किलोग्रॅम गॅस मिळेल. जुन्या घरगुती सिलिंडरचं वजन 17 किलो होतं आणि गॅस भरल्यानंतर ते 31 किलो होत होतं. कॉम्पोजिट सिलिंडर 10 किलो आणि 5 किलोमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 5 किलो सिलिंडरसाठी 363 रुपये मोजावे लागतील. मिळवण्यासाठी गॅस एजन्सीकडे सिक्युरिटी डिपॉझिट जमा करावी लागणार आहे. 10 किलोच्या सिलिंडरसाठी 3350 तर 5 किलोच्या सिलिंडरसाठी 2150 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट जमा करावी लागेल. ग्राहकांना आपले जुने सिलिंडर देऊन कॉम्पोजिट सिलिंडर बदलता येणार आहे.

कॉम्पोजिट सिलिंडर देशातील 28 शहरांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यात अहमदाबाद, अजमेर, अलाहाबाद, बंगळुरू, भुवणेश्वर, चंदीगड, चेन्नई, कोयंबत्तूर, दार्जिलिंग, दिल्ली, फरिदाबाद, गुरुग्राम, हैदराबाद, जयपूर, जालंधर, जमशेदपूर, लुधियाना, म्हैसूर, पाटणा, रांची, रायपूर, सुरत, तिरुचिरापल्ली, तिरुवल्लूर, तुमकूर, वाराणसी आणि विशाखापट्टनम् या शहरांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here