इंडिया स्किल्स स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; १७ पदकांची कमाई

0
22
इंडिया स्किल्स स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; १७ पदकांची कमाई
इंडिया स्किल्स स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; १७ पदकांची कमाई
इंडिया स्किल्स स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; १७ पदकांची कमाई

मुंबई/ग्रेटर नोएडा (प्रतिनिधी): ‘वर्ल्ड स्किल्स’ स्पर्धेची रंगीत तालीम मानल्या जाणाऱ्या IndiaSkills Competition 2025-26 स्पर्धेत महाराष्ट्रातील स्पर्धकांनी उल्लेखनीय यश संपादन करत ४ सुवर्ण, ८ रौप्य आणि ५ कांस्य अशी एकूण १७ पदके पटकावली आहेत. ही स्पर्धा India Expo Centre and Mart, ग्रेटर नोएडा (उत्तर प्रदेश) येथे पार पडली.

या यशाबद्दल राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री Mangal Prabhat Lodha यांनी संपूर्ण चमूचे आणि विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले. आगामी २०२७-२८ मधील ही स्पर्धा मुंबईत आयोजित करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे.

या यशामागे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, National Skill Development Corporation तसेच उद्योग भागीदार व तांत्रिक संस्थांचे वर्षभराचे परिश्रम कारणीभूत ठरले आहेत.

सुमारे १५,२७५ नोंदणीकृत उमेदवारांमधून जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावरील चाळणी प्रक्रियेनंतर ५४ सर्वोत्तम उमेदवारांची राष्ट्रीय स्तरासाठी निवड करण्यात आली होती. स्पर्धेपूर्वी या उमेदवारांना तज्ज्ञांकडून विशेष ‘बूटकॅम्प’ प्रशिक्षण तसेच मानसिक तयारीसाठी समुपदेशन देण्यात आले होते.

या यशामुळे महाराष्ट्रातील विजेत्या उमेदवारांना आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. २०२६ मध्ये Shanghai येथे होणाऱ्या ‘वर्ल्ड स्किल्स’ स्पर्धेसाठी त्यांच्या प्रशिक्षणाची पुढील फेरी लवकरच सुरू होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here