इन्कम टॅक्स रिटर्स भरण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे तसेच ऑडिट रिपोर्टही दाखल करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. नवीन पोर्टलच्या अडचणीमुळे, आयकर भरणाऱ्यांना त्यात रिटर्न भरताना बरीच अडचण येत आहे. करदात्यांना होत असलेल्या समस्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे,माहिती आयकर विभागाने दिली आहे.
इन्फोसिसने हे नवीन पोर्टल तयार केले असून सुरवातीपासूनच या पोर्टलबद्दल नागरिकांच्या तक्रारी येत होत्या.कोणत्याही परिस्थितीत 15 सप्टेंबरपर्यंत नवीन आयकर पोर्टलमध्ये येणाऱ्या समस्या सोडवाव्यात अस अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एमडी सलील पारेख यांना सांगितले असल्याचे वृत्त आहे.
आयकर रिटर्न वेळेवर न भरल्याबद्दल सरकार आयकर भरणाऱ्यावर दंड आकारते. अंतिम मुदत पार केल्यानंतर रिटर्न भरण्यासाठी 5,000 रुपये विलंब शुल्क आहे. जर 31 जानेवारी 2022 पर्यंत विवरणपत्र दाखल केले नाही, तर नोटीस मिळेपर्यंत 2020-21 या आर्थिक वर्षाचे विवरणपत्र भरता येणार नाही.