इन्फोसिस इ.कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे ‘Work From Home’ केले बंद!

0
77

कोरोनाचे देशावर असलेले संकट हळूहळू ओसरत चालले आहे. कोरोनाचा रुग्णांची संख्या देखील कमी होत आहे. देशातील नागरिकांचे लसीकरण मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले आहे.त्यामुळे सरकारने एकापाठोपाठ अनेक निर्बंधामध्ये सूट देण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता कॉर्पोरेट कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसमध्ये बोलवण्यास सुरुवात केली आहे. अनेक कंपन्यांनी कोरोना काळामध्ये कर्माचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिले होते. पण आता वर्क फ्रॉम होम बंद करुन पुन्हा कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलवण्यास सुरुवात केली आहे.

इन्फोसिस टीसीएस, विप्रो यासारख्या आयटी कंपन्यांसह बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रातील अनेक कंपन्यांनीसुद्धा वर्फ फ्रॉम होम बंद करण्यासाठी तयारी दर्शवली आहे.विप्रो कंपनीचे कर्मचारी ज्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत ते सर्व उच्च पदावरील अधिकारी आठवड्यातून दोन दिवस सोमवार आणि गुरुवारी काम करत आहे. तर टीसीएस कपंनी त्यांच्या 90 टक्के कर्मचाऱ्यांना 2022 च्या सुरुवातीपर्यंत ऑफिसमध्ये परत बोलवण्याच्या तयारीत आहे. पण कंपनीने अशी घोषणा केली होती की, 2025 पर्यंत 25 टक्के कर्माचाऱ्यांना 25X25 मॉडेल अंतर्गत घरातून काम करण्यासाठी परवानगी दिली जाईल. विप्रो,इन्फोसिस यासारख्या आयटी कंपन्यांमध्ये हाच मार्ग अवलंबला जात आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांनी ऑफिसला जाण्यासाठी तयारी दर्शवणे गरजेचे आहे.

याचबरोबर एचडीएफसी बँक,एक्सिस बँक,येस बँक पुढच्या काही महिन्यात 90 टक्के कर्मचाऱ्यांसह ऑफिस सुरु करण्याची तयारी करत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here