इस्राईलमध्ये करोना पुन्हा एकदा पसरत आहे!

0
87

करोनाचे संक्रमण पुन्हा एकदा इस्राईलमध्ये पसरत असल्याचे वृत्त हाती आले आहे. इस्राईल हा कोरोनाचे लसीकरण झालेला पहिला देश होता. तेथे ८०टक्के रुग्णांचे लसीकरण झाले होते.कोरोनाचे रुग्णसंख्या कमी आल्यामुळे तेथील लॉकडाऊन उठविण्यात आले होते. मास्कचे निर्बंधही शिथिल करण्यात आले होते.

पण इस्राईलमध्ये गुरुवारी १६९ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आणि त्यामुळे पुन्हा एकदा मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. इस्राइलच्या बिन्यामिना शहरात सर्वाधिक १२२ सक्रिय रुग्ण सापडले आहेत. या मुळे शहरात रेड झोन घोषित करण्यात आला आहे. तर मोदीनितमध्ये ७१ सक्रिय रुग्ण आहेत. तेल अवीव आणि केफर सबातमध्ये ३६, येरुसेलममध्ये ३३, कोचव यारमध्ये ३१ रुग्ण आढळून आले आहेत. सध्या रुग्णालयात दाखल असलेल्या २६ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

यावेळी इमारतींच्या आतमध्येही मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनाच्या नवीन रुग्णवाढीने प्रशासन सतर्क झाले असून आतापासून पावलं उचलण्यात सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर नागरिकांना अनावश्यक प्रवास करणे टाळण्यास सांगितलं आहे. तसेच लहान मुलांना घेऊन विमान प्रवास करू नका, असं सांगण्यात आले आहे. करोनाची लस घेतली असेल आणि करोनाबाधितांच्या संपर्कात आल्यास करोना चाचणी करण्याच्या सूचना देखील सरकारने दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here