त्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचे शनिवारी रात्री येथील संजय गांधी वैद्यकीय विज्ञान संस्थेत (एसजीपीजीआय) निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे कल्याण सिंह यांचं निधन झाले
कल्याण सिंह गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांना ४ जुलै रोजी गंभीर अवस्थेत अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते जवळजवळ बेशुद्धावस्थेत होते. शुक्रवारी त्यांची प्रकृती आणखी खालावली. त्यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याने त्यांना डायलिसीसवर ठेवण्यात आले होते. शनिवारी रात्री त्यांचे निधन झाल्याचे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले.
कल्याण सिंह यांनी दोन वेळा उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होते. ते राजस्थानचे राज्यपाल देखील होते.दहावी-बारावीच्या परिक्षेत कॉपी करणाऱ्यांना शिक्षेची तरतूद करणारा कायदा त्यांनी मुख्यमंत्री असताना केला होता. राजस्थान आणि हिमाचलच्या राज्यपालपदीही त्यांनी काम केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कल्याण सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत कल्याण सिंह यांनी वंचितांसाठी आवाज उठवला तसेच उत्तर प्रदेशच्या विकासात अविस्मरणीय योगदान दिले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.