उत्तर प्रदेशात गंगा नदीत आढळलेल्या मृतदेहांची संख्या ५२

0
73

उत्तर प्रदेशात जियार, कुल्हाडिया व भरौली या घाटांजवळ मंगळवारी सकाळी किमान ४५ मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले. मंगळवारी उशिरा रात्री आणखी ७ मृतदेह आढळल्यामुळे त्यांची एकूण संख्या ५२ वर पोहचली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. कुजलेल्या स्थितीत असलेले काही मृतदेह बलिया- बक्सर पुलानजीक तरंगत असल्याचे आढळल्याचे जिल्हा दंडाधिकारी आदिती सिंह यांनी मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

उपविभागीय दंडाधिकारी राजेश यादव आणि मंडळ अधिकारी जगवीर सिंह चौहान या प्रकाराचा तपास करत असून, मृतांबाबत योग्य तो आदर राखून अंत्यसंस्कार करण्यात आले असे त्यांनी सांगितले. उपविभागीय दंडाधिकारी राजेश यादव आणि मंडळ अधिकारी जगवीर सिंह चौहान या प्रकाराचा तपास करत असून, मृतांबाबत योग्य तो आदर राखून अंत्यसंस्कार करण्यात आले असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here