उद्यापासून पुन्हा एकदा राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा

0
93

पश्चिम बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे उद्यापासून पुन्हा एकदा मुंबईसह राज्यभरात पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी आणखी तीव्र होईल.

आगामी 12 तासांत यामुळे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत ओडिशाच्या किनाऱ्याजवळ हे चक्रीवादळ सरकेल. त्यामुळे प्रभाव म्हणून राज्यातील काही भागात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे रविवारपासून पावसाचा जोर वाढणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here