परिवहन मंत्री अनिल परब यांच्या इशाऱ्यानंतर कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांनि संप मागे घेतला आहे परिवहन मंत्री अनिल परब यांनी संप मागे घेतला नाही तर पगारवाढीवर पुनर्विचार करू असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांना दिला होता.तरीही पुणे ,नाशिक या ठिकाणी एस ती कर्मचाऱ्यांचा संप चालूच आहे.नाशिक शहरामध्ये एसटी महामंडळामध्ये काही कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होत बसेसची प्रवासी वाहतूक सुरू केली. पगारवाढ व्हावी म्हणून संपामध्ये सहभाग घेतला होता मात्र विलीनीकरणाच्या मुद्द्यावर त्यांनी एक पाऊल मागे घेतले आहे.
बस स्थानक परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात येतोय. शिवाय संपावर असलेल्या कर्मचारी आणि कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची सुद्धा होत आहे.औरंगाबाद डेपो मध्ये एकही बस बाहेर पडली नाही.