एसटी कर्मचाऱ्यांच्या संप: शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात तीन तास बैठक

0
54

मुंबईतल्या नेहरु सेंटरमध्ये पार पडलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. तीन तासाहून अधिक वेळ चाललेल्या बैठकीत संपावर कसा तोडगा काढता येईल याबाबत चर्चा झाली.  शरद पवार यांना पूर्ण माहिती देण्यात आली. मात्र, लगेचच कोणताही निर्णय घेणे शक्य नसल्याचे परब यांनी सांगितले. संपामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांचे, ग्रामीण भागातील लोकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या संपावर काय तोडगा काढता येईल, यासंदर्भात शरद पवारांशी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी पवारांसोबतच्या बैठकीनंतर दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here