भारतात ओटीटीचा पुढील स्तरावरचा खेळ सुरू होत आहे. या मोठ्या बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी बॉलिवूड सुपरस्टार्सना ते मागतील तेवढे पैसे दिले जात आहेत. सुपरस्टार्सच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यायाचा हा एक मार्ग आहे त्यामुळे या मोठ्या बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी बॉलिवूड सुपरस्टार्सना ते मागतील तेवढे पैसे दिले जात आहेत.ग्लोबल ऑडिअन्स मिळण्यासाठी बिग बजेट आणि बड्या स्टार्सचा विचार केला जातो.
ओटीटीमध्ये लीड कास्टिंग केली जाते. किती एपिसोड्स आहेत, किती दिवसांचे काम आहे, आउटडोअर आहे किंवा नाही, को-स्टार कोण आहेत, निर्माता कोण आहे, कोणते प्लॅटफॉर्म आहे? या सर्व गोष्टी कास्टिंग आणि दरावर परिणाम करतात. टेक्निकल क्रूसाठी निश्चित दर असू शकतो, पण क्रिएटिव्हमध्ये निश्चित दर असू शकत नाही.
अजय देवगणला वेब सीरिजसाठी 125 कोटींची ऑफर असल्याची चर्चा आहे. यापूर्वी अक्षय कुमारलाही 90 कोटींची ऑफर मिळाली आहे.दुसरीकडे, फॅमिली मॅन 2 नंतर मनोज बाजपेयीसारख्या स्टारला 20-22 कोटींची ऑफर येत असल्याची बातमी आहे.’फॅमिली मॅन’मुळे मनोज बाजपेयीला आता संपूर्ण सीझनसाठी 20 कोटींची ऑफर मिळत आहे.ओटीटीच्या कलाकारांना 10 भागांसाठी 1 ते 3 कोटी आणि मोठ्या स्टार्सना 3 ते 7 कोटी मिळतात.