‘ओह माय गॉड २ ‘च्या सेटवरील 7 क्रू मेंबर्स कोविड पॉझिटिव्ह?

0
67

 ‘ओह माय गॉड २ ‘च्या सेटवरील 7 क्रू मेंबर्स कोविड पॉझिटिव्ह आले आहेत.चित्रपटाचे निर्माते अश्विन वर्दे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.अश्विन वर्दे म्हणाले, 7 क्रू मेंबर्स पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त चुकीचे आहेत. 10 दिवसांपूर्वी, सेटवर फक्त 3 क्रू मेंबर कोविड पॉझिटिव्ह आले होते. त्यांना त्वरित क्वारंटाईन ठेवण्यात आले. आता ते बरे झाले आहेत. आम्ही सातत्याने बीएमसीच्या संपर्कात आहोत आणि सातत्याने त्यांना या तीन लोकांबद्दल अपडेट देत आहोत.

या चित्रपटाच्या मुंबईच्या शेड्युलमध्ये शूटिंगला यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी हे देखील सहभागी होते. त्यांचा कोविड टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. अक्षय कुमार उज्जैनच्या शूटिंग शेड्यूलमध्ये सहभागी होणार आहे. तो तिथे 20 दिवस शूट करेल.

चित्रपटाचे निर्माते अश्विन वर्दे यांनी ‘आम्ही मुंबईचे शेड्युल पूर्ण केले आहे आणि उज्जैनचे शेड्युल सुरू करण्यापूर्वी थोडा ब्रेक घेतला आहे. आमचे उज्जैनचे वेळापत्रक 13 ऑक्टोबरपासून सुरू होणार होते परंतु 3 पॉझिटिव्ह लोकांच्या रिकव्हरीसाठी ते 23 ऑक्टोबरपासून सुरू केले जाईल. तीनही क्रू मेंबर्सचा क्वारंटाईनचा कालावधी 17 ऑक्टोबर रोजी पूर्ण होईल, त्यानंतर त्यांची पुन्हा चाचणी केली जाईल.’मुंबईच्या शेड्युलमध्ये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here