कंगनाने उच्च न्यायालयात धाव!

0
103

कंगना पारपत्राची (Passport) मुदत सप्टेंबरमध्ये संपत असल्यामुळे तिने पारपत्र नूतनीकरणासाठी अर्ज केला होता. मात्र पारपत्र प्राधिकरणाने तिची मागणी फेटाळली आहे. कंगनावर देशद्रोहाच्या आरोपाप्रकरणी गुन्हा दाखल असल्यामुळे पारपत्राचे नूतनीकरण करण्यास पारपत्र प्राधिकरणाने नकार दिला आहे.

कंगनावर वांद्रे पोलिसांनी दोन समाजात ट्विटद्वारे तेढ निर्माण केल्याच्या आरोपाप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे भारतीय पारपत्र प्राधिकरणाने कंगनाच्या पारपत्राचे नूतनीकरण करण्यास नकार दिला आहे. पारपत्र प्राधिकरणाच्या या निर्णयाविरोधात कंगनाने सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेत पारपत्राचे नूतनीकरण करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी देशात व देशाबाहेर जावे लागते असे तिने आपल्या मागणीमध्ये नमुद केले आहे.

कंगनाच्या पारपत्राची मुदत सप्टेंबरमध्ये संपत असून तिला चित्रीकरणासाठी जून ते ऑगस्ट मुंबईबाहेर जायचे आहे. त्यामुळे तिने पारपत्र नूतनीकरणासाठी अर्ज केला होता. मात्र पारपत्र प्राधिकरणाने मागणी फेटाळली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here