कणकवलीत पोलिस यंत्रणेची दंडात्मक कारवाई

0
103

राज्यात कोरोनाची वाढते संक्रमण लक्षात घेऊन शनिवार -रविवारी कडकडीत टाळेबंदी जाहीर केली होती. त्यामुळे मुंबईसह सगळीकडेच आज रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. याच पार्श्वभूमीवर कोकणातही आज सगळीकडेच सामसूम दिसत होती.

व्यापारी संघटनेनेही राज्यसरकारला आपला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे बाजारपेठेतही शांतता होती. पोलीस बंदोबस्तही सगळीकडेच कडक होता. कोकणातही कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे.त्यातच कणकवली शहर हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे लोकांची या शहरात वर्दळ असते. त्यामुळे पोलिस यंत्रणेने शहरात गस्त वाढवली होती. शहरातील नागरिकांनीही घराबाहेर न पडणे पसंत केले आहे. कणकवलीत रेल्वे स्थानकात आलेल्या रिक्षा चालकांकडूनही दंड आकारण्यात आला.तसेच काही तरुणांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here