कदाचित नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याने पक्षाला फायदा होईल-पंकजा मुंडें

0
88

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यामध्ये महाराष्ट्रातून चार जणांना संधी देण्यात आली. पक्षाने डावलल्यामुळे बीडच्या खासदार आणि स्वर्गिय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे त्या नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. आता यावर पंकजा मुंडेंनी स्पष्टीकरण दिले आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘मी पक्षावर नाराज नाही. सर्व नव्या मंत्र्यांचे आता तुमच्या समोर अभिनंदन करते. प्रीतम ताई दोन वेळा सर्वाधिक मताधिक्याने विजय झालेल्या आहेत. त्या उच्चशिक्षित आणि सक्षम आहेत. मात्र कदाचित नवीन चेहर्‍यांना संधी दिल्याने जास्त फायदा होईल असे पक्षाला वाटले असेल म्हणून त्यांनी नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली. पक्षाने घेतलेल्या निर्णय एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्हाला मान्यच आहे.भाजपमध्ये पक्षाचा निर्णय अंतिम असतो तो आम्ही नेहमीच मान्य करत आलो आहोत. आमच्यावर प्रेम करणारी मंडळी निश्चितच नाराज आहेत पण मी त्यांची समजूत घालीन. कारण पक्षनिष्ठा हेच मुंडे साहेबांनी आमच्यावर केलेले संस्कार आहेत ते आम्ही कधीही सोडणार नाही.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here