कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार

0
49

कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे शुक्रवारी निधन झाले. पुनीत राजकुमार यांचे पार्थिव कांतीरवा स्टेडियममध्ये चाहत्यांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. बंगळुरूमध्येच त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांची मुलगी वंदिता अमेरिकेहून परतल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.पुनीत यांची मुलगी वंदिता अमेरिकेहून आज भारतात पोहोचली. वंदिताला दिल्लीहून बंगळुरूला नेण्यासाठी राज्य प्राधिकरणाने विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली.पुनीत यांच्या पश्चात पत्नी अश्विनी रेवंत आणि दोन मुली असा परिवार आहे.

पुनीत यांना जिममध्ये वर्कआउट करत असताना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना तातडीने बंगळुरूच्या विक्रम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

पुनीत राजकुमार यांच्या निधनामुळे संपूर्ण कर्नाटकात शोककळा पसरली आहे. राज्यातील सर्व चित्रपटगृहे बंद करण्यात आली आहेत. चाहत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे. कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील अथनी येथील एका तरुणाने पुनीत यांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर आत्महत्या केली आहे तर एका तरुणाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here