रत्नागिरी – अवैध सावकारी व्यवसायाला पायबंद घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी पोलीस ठाणे स्तरावर नागरिकांचे प्रबोधन करण्यास सुरुवात केली आहे. कर्ज घेताना स्टॅम्प पेपर किंवा इतर कोऱ्या कागदपत्रांवर सह्या करू नका, नागरिकांनी सहकारी संस्था, बँका किंवा राष्ट्रीयकृत बँकांकडूनच कर्ज घ्यावे, असे आवाहन पोलीस दलाने केले आहे. सावकाराकडून फसवणूक किंवा उपद्रव झाल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सहाय्यक निबंधकाकडे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस दलाने केले आहे.