कळणे येथील खाणकाम व खनिजाची वाहतूक तात्काळ बंद करण्याचेआदेश-जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

0
100

दोडामार्ग तालुक्यातील मौजे कळणे येथील 32.25 हेक्टर आर क्षेत्रावरील खाणपट्ट्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन अधिनियननुसार खाणकाम व खनिजाची वाहतूक तात्काळ बंद करण्याचे आदेश मे.मिनरल्स अँड मेटल्स यांनी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे दिले आहेत ..

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 30 मधील पोट कलम 3 व 5 अन्वये, हे आदेश देतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी खाण सुरक्षा निर्देशालय, प्रादेशिक कार्यालय, गोवा यांच्या निर्देशानुसार आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्याबाबत ही आदेशीत केले आहे.

मे मिनरल्स ॲँड मेटल्स करिता संचालक संदीप श्रीवास्तव व व्यवस्थापक माईन्स मॅनेजर, कळणे माईन यांना पाठविलेल्या या आदेशात म्हटले आहे, 29 जुलै रोजी सकाळी खनिज खाणपट्ट्यातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर होऊन 20 ते 25 कुटुंबांच्या घरामध्ये पाणी गेले. शेतीचे व बागायतीचे नुकसान झाले. त्यामुळे येथील खाणकाम तवारीत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here