राहुल गांधींना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसल्यानंतर त्यांनी चाचणी केली असता चाचणी पॉझिटिव्ह आली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर याची माहिती शेअर केली. त्यांनी स्वतःला आयसोलेट केले असल्याचे सांगितले .दोन दिवसांपूर्वी त्यांनी वाढता कोरोना पाहता बंगालमध्ये होणाऱ्या आपल्या सर्व रॅल्या रद्द केल्या होत्या.
यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल देखील कोरोना संक्रमित आढळल्या होत्या.त्यांनी स्वतःला होम आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही क्वारंटाइन आहेत.