कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत.देशातील प्रत्येक नागरिक एकमेकांना मदत करत आहेत.बॉलिवूडचे अनेक कलाकार कोरोनाच्या पहिल्या लाटेतही लोकांना मदत करत होते. त्यातच आज अभिनेत्री करीना कपूरने सोशल मीडियावर एक माहिती शेअर केली आहे. यामध्ये तिने ज्या महिलांच्या पतीचा मृत्यु कोरोनामुळे झाला आहे अशा महिलांच्या दु:खात सहभागी असून तिने सहानुभूती व्यक्त केली आहे. तसेच तिने त्यांना रोजगार मिळवण्यात मदत मिळून देऊ शकते असे लिहिले आहे.त्याशिवाय तिने चालू केलेल्या या उपक्रमात कोणीही वॉलेंटियर म्हणून काम करू शकेल असेही तिने म्हंटले आहे.
रीम सेनच्या या पोस्टमध्ये कोविड विडोज डॉट इनवर याविषयी माहिती देण्यात आली आहे. ही वेबसाइट समुपदेशन, देखरेखच्या माध्यमातून महिलांना काम मिळवून देणार आहे. यासाठी सरकार आणि एनजीओची मदत घेतली जाणार आहे.