काेल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन

0
97

नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी करवीरनिवासिनी अंबाबाई देवी मंदिरात बॉम्ब ठेवल्याच्या निनावी फोनने नवरात्रोत्सवाच्या सुरक्षा यंत्रणेची तारांबळ उडवली.पोलिसांसह मंदिरातील कर्मचाऱ्यांची हि चांगलीच धावपळ उडाली.मंदिर परिसरात दुपारी तीनच्या सुमारास कोल्हापूर पोलिस मुख्यालयात फोन व बाॅम्बशोध पथक, डाॅग स्क्वॉड आणि सगळी सुरक्षा यंत्रणा दाखल झाली.

श्वानपथक तसेच बॉम्बशोध पथक आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी अंबाबाई मंदिरात संध्याकाळी सात वाजेपर्यंत ठाण मांडले होते. तपासणीअंती संशयास्पद वस्तू आढळून आल्या नाहीत.तपासणी झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले.

करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे ऑनलाइन बुकिंगच्या पासेसद्वारे दररोज १० हजार भाविकांना दर्शन घेता येणार आहे. एका तासात ७०० भाविकांना दर्शनासाठी सोडले जाणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही ओटी अथवा पूजेचे कोणत्याही प्रकारचे साहित्य सोबत नेता येणार नाही. त्याच पद्धतीने श्रीपूजकांनीही भाविकांकडून ओटी अथवा पूजेचे साहित्य मंदिरात नेऊ नये.

भाविकांचे काेराेना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झालेले हवे, तसे सर्टिफिकेट जवळ असावे.ज्या भाविकांचे कोविड १९ चे दोन्ही डोस पूर्ण नसतील अशा भाविकांसाठी ७२ तासांतील आरटीपीसीआर तपासणीचा निगेटिव्ह रिपोर्ट असणे आवश्यक आहे.

मास्क वापरणे बंधनकारक आहे. सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझर वापरणे गरजेचे.
– ऑनलाइन पास व अन्य काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास प्रशांत दामरे यांच्याशी ९२२४३४६६०९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here