कुडाळ-झाराप रेल्वे स्टेशन परिसरात यांत्रिकीकरण सामान वाहतूक रेल्वेच्या डब्याला आग

0
82

कोकण रेल्वेचे सध्या विद्युतीकरणाचे काम सुरू आहे.यासाठीचा डेपो हा कुडाळ- झाराप येथे आहे. त्या ठिकाणी मालवाहतूक करण्यासाठी या डब्याचा वापर करण्यात येत होता. मात्र आज सकाळी नऊ-साडेनऊच्या दरम्यान या डब्याला अचानक आग लागली. आग लागल्याचे तेथील काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबतची माहिती स्टेशन मास्तरांना दिली. त्यांनी तात्काळ सावंतवाडी तसेच परिसरातील बंबाला पाचारण केले. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत एक दीड तासाचा कालावधी उलटला होता. दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर आग विझवण्यात यश आले. या प्रकरणी कोणतेही नुकसान झालेले नाही अशी माहिती हाती आली आहे. आगीचे कारण शोधण्याचे काम चालू आहे.

यादरम्यान या मार्गावरून धावणारी मांडवी रेल्वेगाडीला मडुरा येथे रोखण्यात आले होते तर तुतारी एक्सप्रेसला कुडाळ येथे थांबविण्यात आले होते.रेल्वे वाहतुक साडेअकरा वाजता पूर्ववत करण्यात आल्यावर या गाड्या मार्गस्थ झाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here