कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 44 मि.मी. पाऊस

0
68
सावंतवाडी तिलारी कार्यालयावर धडक मोर्चा
सावंतवाडी तिलारी कार्यालयावर धडक मोर्चा -रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांचा इशारा

सिंधुदुर्ग– सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 44 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 29.15 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1071.76 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 12.00 (1172), सावंतवाडी – 20.00 (1313.70), वेंगुर्ला – 28.20 (834.40), कुडाळ – 44.00 (957.0), मालवण – 36.00 (1037.0), कणकवली – 37.00 (1193.0), देवगड – 22.00 (907.0), वैभववाडी – 34.00 (1160.0), असा पाऊस झाला आहे.

तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 11.20 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 355.1710 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 79.39 टक्के भरले आहे. सध्या या प्रकल्पातून 24.11 घ.मी. सेकंद इतका विसर्ग सुरू आहे. जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 59.3370, अरुणा – 30.0696, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 2.6480, नाधवडे – 3.2819, ओटाव – 1.5199, देंदोनवाडी – 0.4347, तरंदळे – 0.8680, आडेली – 1.2540, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 1.9780, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 1.3670, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 0.8010, दाभाचीवाडी – 1.3760, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 1.9580, कारिवडे – 0.9740, धामापूर – 1.6410, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 0.8880, ओझरम – 1.8190, पोईप – 0.7610, शिरगाव – 0.6220, तिथवली – 1.2080, लोरे – 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here