कुडाळ शहरातील विकास कामांसाठी आ. वैभव नाईक यांनी आणले २ कोटी १८ लाख

0
97

प्रतिनिधी पांडुशेठ साटम

खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे कुडाळ नगरपंचायत हद्दीतील विकास कामांसाठी २ कोटी १८ लाख रु. निधी मंजूर करण्यात आला. आहे. नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योनजनेंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

यामध्ये कुडाळ नगरपंचायत हद्दीतील कुडाळ लक्ष्मी वाड़ी महापुरुष मंदीरा शेजारी उद्यान विकसित करणे उद्यान उभारणे निधी १ कोटी, कुडाळ नगरपंचायत करीता अग्निशामक वाहन खरेदी करणे व कुडाळ बाजारपेठ वाचनालय ते उदय नाडकर्णी घरापर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे यासाठी निधी ५३ लाख, कुडाळ इंद्रप्रस्थ नगर नेमळेकर घर ते नाल्यापर्यंत रस्त्यालगत दुतर्फा गटार बांधणे निधी १० लाख, कुडाळ मधली कुमार वाडी येथे मोहन गोसावी घर ते जयदेव पालयेकर घरापर्यंत रस्त्यालगत बंधीस्त गटार बांधणे, कुडाळ इंद्रप्रस्थ नगर मुख्य रस्ता ते बापट यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे,कुडाळ कविलकाटे कुंभळेवाडी रमेश हरमळकर घर ते दशरथ हरमळकर यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे,कुडाळ लक्ष्मीवाडी लक्ष्मी मंदिर ते कांबळी वाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण, कुडाळ लक्ष्मीवाडी लक्ष्मी मंदिर ते मुख्य रस्ता वायंगणकर निवास जाणारा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे या ५ कामांसाठी निधी १७ लाख, कुडाळ गणेश नगर येथील हेमंत कुडाळकर घर ते अजय लोरेकर घरापर्यंत रस्त्यालगत बंधीस्त गटार बांधणे, कुडाळ वेंगुर्ला रोड नंदनवन पार्क नवीन वसाहत येथे रस्त्यालगत बंधीस्त गटार बांधणे या २ कामांसाठी निधी १५ लाख, कुडाळ कविलकाटे साळगावकर घर ते नामदेव जळवी घरापर्यंत रस्त्यालगत गटार बांधणे,कुडाळ लक्ष्मीवाडी वायंगणकर निवास ते काळप नाका येथे बंधीस्त गटार बांधणे या दोन कामांसाठी निधी ११ लाख, कुडाळ इंद्रप्रस्थ नगर मुख्य रस्ता ते बापट यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता येथे दुतर्फा गटार बांधणे, कुडाळ बांदेकर घर ते मधली कुंभारवाडी सार्वजनिक विहीर पर्यन्त रस्त्यालगत दुतर्फा गटार बांधणे, कुडाळ हायवे श्रीरामवाडी तेओंकार रेसिडेंसी (उमळकर चाळ )रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे या तीन कामांसाठी १२ लाख निधी मंजूर करण्यात आले असून एकूण सर्व कामांसाठी एकूण २ कोटी १८ लाख रु निधी मंजूर करण्यात आला आहे.

         

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here