‘कृषिक’ मोबाईल ॲप रासायनिक खताच्या मात्रांसाठी वापरण्याचे आवाहन

0
68

सिंधुदुर्गनगरी – कृषि विज्ञान केंद्र, बारामती व कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘कृषिक’ नावाचे मोबाईल ॲप विकसीत केले आहे .’कृषिक’ नावाच्या या मोबाईल ॲपद्वारे रासायनिक खतांचा कमीक कमी व संतुलित वापर शेतकऱ्यांना करता येणार आहे. तसेच यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन अधिक उत्पन्न मिळविण्याच्या उद्देशाने प्रत्येक पिकांसाठी अचूक व फायदेशीर खत मात्रा निवडणे शक्य होणार आहे.शिफारस केलेल्या मात्रा मिळवण्यासाठी ‘कृषिक’ या मोबाईल ॲपमधील गणकयंत्राचा वापर शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे. रासायनिक खतांचा कमीक कमी व संतुलित वापर होण्याच्या दृष्टीने तसेच जमिनीची सुपिकता वाढीस लागून अधिक उत्पन्न मिळण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. शेतकऱ्यांना या खत मात्रा सहज व सुलभ पद्धतीने मिळाव्यात यासाठी ‘कृषिक’ – खत गणकयंत्र विकसीत करण्यात आले आहे.

या ‘कृषिक’ ॲप – खत गणकयंत्राची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
संबंधित कृषि विद्यापीठाच्या पिकनिहाय खत शिफारशींचा समावेश, जमिन आरोग्य पत्रिका आधारीत विविध पिकांसाठी शिफारस केलेली खतमात्रा, बाजारातील किंमतीनुसार प्रति एकर आवश्यक खतमात्रांच्या खर्चाची गणना, पिकांसाठी शिफारस केलेल्या खतमात्रेचे नत्र, स्फुरद व पालाश वापरासाठी विविध खतांचे पर्याय, शिफारस केलेल्या खतांच्या विभाजीत (स्प्लीट) मात्रांची गणना, सरळ व संयुक्त खतांच्या शिफारशींचे पर्याय उपलब्ध, गावनिहाय जमीन सुपिकता निर्देशांकानुसार खतमात्रांची परिगणना इत्यादी गोष्टींचा लाभ घेता येईल.
या ॲपच्या माध्यमातून कृषि विद्यापीठांनी शिफारस केलेल्या विविध पिकांसाठीच्या खतमात्रा परिगणित करुन खतांचा फायदेशीर पर्यात निवडा व भरघोस उत्पन्न मिळवावे असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here