भारतात कोविड-१९ ची वाढत जाणारे प्रमाण बघता कॅनडा, यूएईसह नऊ देशांची भारताच्या उड्डाणांवर प्रवासावर ३० दिवसांसाठी बंदी आणली आहे. या देशांंतील दुबई, सिंगापूर, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आेमान, हाँगकाँग, फ्रान्सनेही भारताच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. सिंगापूरमध्ये १४ दिवस क्वाॅरंटाइन झाल्यानंतर सात दिवसांपर्यंत घरात राहावे लागणार आहे.
भारतातून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशास दुबईत प्रवेश नाही. १४ दिवसांसाठी विशेष व्यवस्थेत व नंतर ७ दिवस घरात विलगीकरणात राहावे लागेल. न्यूझीलंडचे प्रवासीही ११ ते २८ एप्रिलदरम्यान परत येऊ शकत नाहीत. हाँगकाँगमधून भारतातून येणारी-जाणारी विमान उड्डाणे ३ मेपर्यंत रद्द केली.