केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यातील चार खासदारांची वर्णी

0
103

राणे, कराड, पवार, पाटील यांना मिळाली संधी

आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. केंद्र सरकारने मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या 43 नेत्यांची यादी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील चौघांचा मंत्रिमंडळात समावेश आहे. नारायण राणे, भागवत कराड, भारती पवार आणि कपिल पाटील हे चार नेते मंत्रिपदाची शपथ घेतील.

मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली तेव्हापासून महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागणार याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यामध्ये नारायण राणेंचे नाव हे आघाडीवर होते. या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. नारायण राणे यांचे यादीत पहिलेच नाव आहे. यासोबतच हिना गावित, प्रीतम मुंडे यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकलेली नाही. अखेर विस्तारात महाराष्ट्रातून नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील आणि भारती पवार यांचा समावेश करण्यात आला आहे.

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी शपथ घेणाऱ्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाला भेट दिली. तथापि, मोदींनी त्या 43 मंत्र्यांची बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सहा वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार करतील. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत ज्योतिरादित्य सिंधिया आणि सर्वानंद सोनोवाल हे सर्व संभाव्य मंत्री उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here